शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वणी उपबाजारात कांद्याला विक्रमी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 10:23 PM

वणी : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक मंदावल्याने दर तेजीत आहेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या तुलनेत दिंडोरी बाजार समितीच्या वणी उपबाजारात कांद्याला ६११६ रुपये असा दर मिळाल्याने विक्रमी व्यवहाराची नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे६११६ रुपये क्ंिवटल । तेजीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक मंदावल्याने दर तेजीत आहेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या तुलनेत दिंडोरी बाजार समितीच्या वणी उपबाजारात कांद्याला ६११६ रुपये असा दर मिळाल्याने विक्रमी व्यवहाराची नोंद झाली आहे.शनिवारी अवघ्या २० वाहनांतून ३५० क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल ६११६ रुपये, किमान ५१५६, तर सरासरी ५७५६ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दक्षिण भारतातही मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. देशभरात तेथून कांद्याची मोठी निर्यात केली जाते. मात्र तेथेही पावसाने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.त्यामुळे देशभरात कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. कांद्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने दर तेजीत असल्याचे एका स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. हवामान खात्याने अजून काही दिवस पर्जन्याचा अंदाज वर्तवल्याने कांदा दरवाढीचे संकेत प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कांदा खरेदी - विक्रीच्या व्यवहारात तेजीचे वातावरण दिसून येत आहे.लासलगाव येथे५३६९ रुपये क्ंिवटललासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी कांद्याला हंगामातील विक्रमी ५३६९ रुपये दर जाहीर झाला. नीचांकी कांदा आवक होऊन या हंगामात दि. १९ सप्टेंबर रोजी ५१०० रुपये दर होता. शनिवारी सकाळ सत्रात २१ वाहनांतील २३७ क्विंटल आवक झाली. त्यामुळे कांद्याला किमान १८९१ ते कमाल ५३६९ रुपये, तर सरासरी ४९०१ भावाने विक्र ी झाला. शुक्र वारी (दि. १) २४९२ क्विंटल आवक होऊन लिलावात किमान २१०० ते कमाल ४८०१ व सरासरी ४५५१ रुपये भाव मिळाला होता. गुरुवारी कांदा आवक कमी झाल्याने व दक्षिणे-कडील राज्यात कांदा आवक कमी होत असल्याने मागणी वाढल्याने बुधवारच्या तुलनेत ५८० रुपयांची कमाल दरात तेजी होती.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी