लासलगाव येथील लिलावात कांदा २८६२ रूपये सर्वाधिक दराने लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:13 IST2020-09-09T22:35:24+5:302020-09-10T01:13:10+5:30
लासलगाव : कृषि उत्पन्न बाजार समतिीत आज 2862 रूपये सर्वाधीक भावाने 16304 क्विंटल कांदा लिलाव झाला. आज 1000 ते 2862 तर 2501 रूपये भावाने लिलाव झाला. काल मंगळवारी 924 वाहनातील 11992 क्विंटल कांदा लिलाव किमान 800ते कमाल 2554 तर सरासरी 2000 रूपये भावाने झाला.

लासलगाव येथील लिलावात कांदा २८६२ रूपये सर्वाधिक दराने लिलाव
ठळक मुद्देहिरवी मिरची व शिमला मिरची लिलाव मार्केट दररोज दुपारी १२ ते पाच वाजेपर्यंत सुरु
लासलगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (दि.९) २८६२ रूपये सर्वाधीक दराने १६३०४ क्विंटल कांदा लिलाव झाला. बुधवारी १००० ते २८६२ तर २५०१ रूपये दराने लिलाव झाला. मंगळवारी ९२४ वाहनातील ११९९२ क्विंटल कांदा लिलाव किमान ८०० ते कमाल २५५४ तर सरासरी २००० रूपये भावाने झाला.
गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ६५,६८८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये ५०१ कमाल रु पये २,४५१ तर सर्वसाधारण रु पये १.९०३ प्रती क्विंटल राहीले. खानगाव नजिक येथे हिरवी मिरची व शिमला मिरची लिलाव मार्केट दररोज दुपारी १२ ते पाच वाजेपर्यंत सुरु झालेले आहे.