लासलगाव येथील लिलावात कांदा २५५४ रूपये सर्वाधिक दराने विक्र ी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 21:11 IST2020-09-08T21:10:26+5:302020-09-08T21:11:02+5:30
लासलगाव : लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि.८) ९२४ वाहनातील ११९९२ क्विंटल कांदा लिलाव किमान ८०० ते कमाल २५५४ तर सरासरी २००० रूपये भावाने झाला.

लासलगाव येथील लिलावात कांदा २५५४ रूपये सर्वाधिक दराने विक्र ी
लासलगाव : लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि.८) ९२४ वाहनातील ११९९२ क्विंटल कांदा लिलाव किमान ८०० ते कमाल २५५४ तर सरासरी २००० रूपये भावाने झाला.
गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांद्याची ६५,६८८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये ५०१ कमाल रु पये २,४५१ तर सर्वसाधारण रु पये १,९०३ प्रती क्विंटल राहीले.
खानगाव नजिक येथे हिरवी मिरची व शिमला मिरची लिलाव मार्केट दररोज दुपारी १२ ते पाच वाजेपर्यंत सुरु झालेले आहेत अशी माहीती सभापती सुवर्णा जगताप यांनी व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.
लासलगांव येथील मुख्य बाजार आवारात बुधवार (दि.९) पासून कांदा लिलावाची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंत राहील व दुपारून ३ ते कांदा लिलाव संपेपर्यंत राहिल. कांदा खरेदीचे लिलाव अर्धा तास अगोदर चालू होतील असे बाजार समितीचे वतीने सांगण्यात आले.