फटाक्यांमुळे  कांद्याच्या चाळीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 18:46 IST2018-11-10T18:45:59+5:302018-11-10T18:46:10+5:30

तीन ट्रॅक्टर साठविलेला कांदा चाळीसह जळून खाक झाला

Onion slices fire due to crackers | फटाक्यांमुळे  कांद्याच्या चाळीला आग

फटाक्यांमुळे  कांद्याच्या चाळीला आग

ठळक मुद्देश्रीमती हिराबाई बाळू बोरसे यांच्या राहत्या घराशेजारी त्यांच्या मालकीच्या कांदा चाळीला सायंकाळी सात वाजता अचानक आग लागली

साकोरा (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील खळवाडी शिवारात कांदाचाळीला अचानक लागलेल्या आगीत अंदाजे तीन ट्रॅक्टर साठविला कांदा चाळीसह जळून खाक झाला. त्यात सुमारे लाख रु पयांचे नुकसान झाले आहे.
दिवाळीची धामधूम सुरू असल्याने फटाक्यांची आतषबाजी सुरू होती, दोन दिवसांपूर्वी साकोरा येथील श्रीमती हिराबाई बाळू बोरसे यांच्या राहत्या घराशेजारी त्यांच्या मालकीच्या कांदा चाळीला सायंकाळी सात वाजता अचानक आग लागली. नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु चाळीला ऊसाचे पाचट असल्याने आगीने उग्र रूप धारण केले. त्यात साठविलेला कांदा जळून खाक झाला. तलाठी कपिल मुत्तेपवार यांनी प्रत्यक्ष जावून पंचनामा केला असता अंदाजे तीन ट्रॅक्टर (८० क्विंटल) साठविलेला कांदा जळून एक लाख सहा हजार रूपये नुकसान झाले असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

Web Title: Onion slices fire due to crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.