कांदा बियाणे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:32 PM2019-11-12T17:32:17+5:302019-11-12T17:32:36+5:30

अभोणा - कांद्याच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने बियाण्यांच्या किमती वाढल्या आहे. पायलीला आठ हजारापेक्षा जास्त भाव मोजावा लागत आहे.

 Onion seeds became expensive | कांदा बियाणे महागले

कांदा बियाणे महागले

googlenewsNext
ठळक मुद्देबाजरी, मका यांना कोंब फुटल्याने तसेच भात पिकांची वाताहात झाल्याने हे कमी की काय म्हणुन कांदे व उळे अति पाऊस व दव यामुळे संपुर्ण खराब झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अभोणेसह परिसरात दोन वेळा टाकलेले रोप पूर्ण खराब झाले असुन आता तिसऱ्यांदा पुन्हा शेतात उळे ट


अभोणा - कांद्याच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने बियाण्यांच्या किमती वाढल्या आहे. पायलीला आठ हजारापेक्षा जास्त भाव मोजावा लागत आहे.
पीक पेरणीच्या वेळी पावसाने केलेला उशीर त्यातच लष्करी अळींचे आक्र मण यामुळे पिकांच्या उत्पादनात झालेली घट आणि जे काही पदरात पडणार होते तेही संततधारेने हिरावुन नेले. बाजरी, मका यांना कोंब फुटल्याने तसेच भात पिकांची वाताहात झाल्याने हे कमी की काय म्हणुन कांदे व उळे अति पाऊस व दव यामुळे संपुर्ण खराब झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अभोणेसह परिसरात दोन वेळा टाकलेले रोप पूर्ण खराब झाले असुन आता तिसऱ्यांदा पुन्हा शेतात उळे टाकत कांद्याचे रोप तयार करण्याची वेळ आली आहे. त्यातच कांद्याच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने बियाण्यांच्या किमती वाढल्या आहे पायलीला आठ हजारापेक्षा जास्त भाव मोजावा लागत आहे. असे असले तरी मिळेल त्या भावात बियाणे खरेदी करत शेतकº्यांची बियाणे टाकण्यासाठी लगबग सुरू आहे. परतीच्या पावसाने यंदा पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.भुजल साठयात वाढ झाल्याने तसेच उन्हाळ कांदा पिकास लागवडपुर्व उच्चांकी भाव मिळत असल्याने यंदा या पिकाचे क्षेत्र वाढणार असल्याचे चित्र आहे. यंदा पाऊस अधिक झाल्याने हिवाळ्यात दव अधिक पडेल व कांदा रोप खराब होईल म्हणुन तुषार सिंचनावर कांदा रोप तयार करण्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळला आहे. ज्यामुळे रोपावर दव जरी पडले तरी तुषार सिंचनावर रोपास पाणी दिल्याने रोपावरील दवबिंदु धुतले जाऊन रोप चांगले राहते. 

Web Title:  Onion seeds became expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.