अज्ञात इसमाकडून चाळीत युरिया खत टाकल्याने कांदा सडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:53 IST2020-07-29T20:42:12+5:302020-07-30T01:53:35+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील भिंगारे गावातील रखमाजी काळे यांच्या चाळीत अज्ञात इसमाने खोडसाळ वृत्तीने कांदा चाळीत रासायनिक युरिया खत टाकले, त्यामुळे संपूर्ण चाळीतला कांदा खराब झाला आहे.

अज्ञात इसमाकडून चाळीत युरिया खत टाकल्याने कांदा सडला
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील भिंगारे गावातील रखमाजी काळे यांच्या चाळीत अज्ञात इसमाने खोडसाळ वृत्तीने कांदा चाळीत रासायनिक युरिया खत टाकले, त्यामुळे संपूर्ण चाळीतला कांदा खराब झाला आहे.
आधीच बाजारभाव कमी त्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यामुळे शेतकºयाला मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. शेतकरी रखमाजी काळे यांनी कांदा चाळीत एप्रिल महिन्यात ७०० क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. त्यापैकी त्यांच्या चाळीचा एक कप्पा म्हणजे ३५० क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे. जळगाव नेऊर येथील तलाठी अस्मिता भगत यांनी घडलेल्या प्रकरणाची पहाणी करून दोन लाख रु पये नुकसानीचा पंचनामा केला आहे.
(फोटो २९ येवला)
येवला तालुक्यातील भिंगारे येथील शेतकरी रखमाजी काळे यांचा युरियामुळे सडलेला कांदा.