लासलगावला कांदा दरात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:16 AM2020-01-15T01:16:47+5:302020-01-15T01:19:12+5:30

लासलगाव येथील बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सरासरी भावात दोनशे रूपयांची तेजी होऊन १८७५ वाहनातील लाल कांदा १५०० ते ३८०० रुपये व सरासरी ३३०० रुपये दराने विक्री झाला. सोमवारी १८०५१६ क्विंटल कांदा लिलाव १२०० ते ३४०२ रुपये भावाने विक्री झाला.

Onion price improvement | लासलगावला कांदा दरात सुधारणा

लासलगावला कांदा दरात सुधारणा

googlenewsNext
ठळक मुद्दे २०० रूपयांची किरकोळ तेजी

लासलगाव : येथील बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सरासरी भावात दोनशे रूपयांची तेजी होऊन १८७५ वाहनातील लाल कांदा १५०० ते ३८०० रुपये व सरासरी ३३०० रुपये दराने विक्री झाला. सोमवारी १८०५१६ क्विंटल कांदा लिलाव १२०० ते ३४०२ रुपये भावाने विक्री झाला.
लासलगाव बाजार समितीत शुक्र वारी गुरुवारच्या तुलनेत शुक्र वारी एकाच दिवशी आठशे रुपयांची घसरण झाली, तर मागील सप्ताहाच्या तुलनेत थेट २२०० रुपयांची घसरण या सप्ताहात शेवटच्या दिवशी झाली होती. कांदा उत्पादकांच्या नाराजीचा सूर वाढला आहे. शुक्र वारी, दि. १० जानेवारी रोजी १९६३ वाहनातील २१,३३८ क्विंटल लाल कांदा किमान १००० ते कमाल ३५४० व सरासरी कांदा भाव २७०० रुपये जाहीर झाले. सरासरी भावात आठशे रुपयांची तर किमान भावातही पाचशे रुपयांची घसरण एकाच दिवशी झाली. कांदा भाव पूर्ववत खाली आल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्याकरिता बंद असलेली कांदानिर्यात बंदी त्वरित उठवावी व कांदा साठवणुकीवर आलेले निर्बंधांचे रद्द करावेत, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती सुवर्णा जगताप यांनी केली आहे. दिनांक ११ व १२ रोजी साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) असल्याने कांदा व धान्य लिलाव बंद होत. त्यामुळे परिसरातून येणाऱ्या कांदा लिलावासाठी शेतकऱ्यांची संख्या वाढली होती.
आवक वाढली
बाजार समितीत आवक वाढल्यामुळे कांदा भावात घसरण सुरूच असून, गुरूवारी दोनशे रूपयांची घसरण होत १६५५ वाहनातील १७८०० क्विंटल लाल कांदा किमान १५०० ते कमाल ४३४२ व सरासरी ३५०० रूपये भावाने विक्र ी झाला होता.
४गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची १,०५,०७२ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये १,०५१ कमाल रु पये ५,७५१, तर सर्वसाधारण रु पये ४,२०१ प्रती क्विंटल राहिले.

Web Title: Onion price improvement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.