शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

भाव कोसळल्याने रस्त्यावर ओतला कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 16:21 IST

सटाण्यात आंदोलन : दीड रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त

ठळक मुद्देशेतक-यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती

नाशिक - जिल्ह्यातील आघाडीचा कांदा उत्पादक तालुका म्हणून परिचित असलेल्या बागलाणमध्ये बुधवारी (दि. १२) नवीन कांद्याला अवघा दीड रु पये किलो भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तोच कांदा रस्त्यावर आणून ओतत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी शेतक-यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, राष्वादी कॉँग्रेसनेही या आंदोलनात उडी घेत शेतक-यांना पाठिंबा दर्शविला.तालुक्यात दुष्काळी पार्श्वभूमीवरही नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून दुसरीकडे समाधानकारक भाव नसल्याने चाळीत साठवलेल्या उन्हाळी कांद्याचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे, बाजारात नवीन व जुना अशा दोन्ही प्रकारचा कांदा येत असून दरातील घसरगुंडी मात्र कायम आहे. सद्यस्थितीत कांद्याला अतिशय नीचांकी अल्प दर मिळत असून त्यात उत्पादन खर्चच नव्हे तर वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग प्रचंड संतप्त झाला आहे. बुधवारी सकाळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरू होताच बाजारभावात सुधारणा न होता उलटपक्षी जास्तच घसरगुंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी ट्रॅक्टर बाजार समिती बाहेर आणून राष्ट्रीय महामार्गावर सर्व कांदा रस्त्यावर ओतून दिला. रस्त्यावर सर्वत्र कांदा पसरल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आंदोलनात उडी घेत रस्त्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग व मालेगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दीड तासानंतर शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा