शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

बाजारात कांद्याला ५२६१ रु पये प्रतिक्विंटल दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 18:14 IST

पिंपळगाव बसवंत : गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याच्या चढ उतारच्या दराने बाजार हादरून गेला आहे. दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक होऊन बाजार सावरण्याची अपेक्षा सर्वांना होती. मात्र नवीन कांद्याची आवक सुरू होऊनही कांद्याच्या दरात फारसा बदल दिसत नाही. शनिवारपर्यंत बाजारात ६०००ते ६१०० प्रतिक्विंटल असणाऱ्या चांगल्या कांदात सोमवारी २०० रुपयांची घसरण होऊन ५९०० रु पर्यंत गेला.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : सोमवारच्या तुलनेत ६३९ रुपयांची घसरण

पिंपळगाव बसवंत : गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याच्या चढ उतारच्या दराने बाजार हादरून गेला आहे. दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक होऊन बाजार सावरण्याची अपेक्षा सर्वांना होती. मात्र नवीन कांद्याची आवक सुरू होऊनही कांद्याच्या दरात फारसा बदल दिसत नाही. शनिवारपर्यंत बाजारात ६०००ते ६१०० प्रतिक्विंटल असणाऱ्या चांगल्या कांदात सोमवारी २०० रुपयांची घसरण होऊन ५९०० रु पर्यंत गेला.मंगळवारी (दि १२)कांद्याच्या भावात कमालीची घसरण होत ६३९ रुपये दराची घसरण झाली आहे. कांद्याच्या मागणीत घट होत असल्याने हे कांद्याचे भाव दर दोन दिवसांनी कमी जास्त होत असल्याची परिस्थिती बाजारात आहे. येत्या आठवडाभरात हे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे शंभरी गाठण्याच्या स्थितीत असणाºया कांद्याला ब्रेक लागणार का ? की, अजून लाली आणणार हे शिल्लक आलेल्या व नव्यानं दाखल होणाºया लाल कांद्यावरच अवलंबून आहे.शेतात लावलेला कांदा बाहेर काढण्याआधीच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेकांची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर बाजारात अपेक्षीत असलेला कांदा बाजारात येऊच शकलेला नाही. जो काही नवीन कांदा बाजारात येण्यास सुरु वात झाली आहे, तो कांदा ओलाच असून पूर्णपणे पाण्यात भिजलेला आहे. हा कांदा सुकवून बाजारात पाठवू शकत नाही तसेच, बाजारात आलेला हा ओला कांदा टिकेल, अशी परिस्थितीही नाही. त्यामुळे बाजारात चांगला सुका, जुना कांदा फारच कमी प्रमाणात येत आहे. जो काही येत आहे, त्याला मागणी असल्याने त्याच्या दरात दर दोन दिवसांनी चढउतार होत आहे.मागील मिहन्यात ४० रुपये किलोपर्यंत असलेला हा उन्हाळ कांदा बाजारात शनिवारी ५०६१ रुपये प्रतिक्विंटलचा दर सोमवारी ५९०० रु पये होता तर यात मंगळवारी ६३९ रु पयांची घसरण होऊन ५२६१ रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विक्र ी झाला आहे.बाजारात चांगल्या कांद्याला ५० ते ५२ रुपये किलोचा दर मिळत असल्याने बाजारात येणाºया नवीन ओल्या आणि खराब होत जाणाºया कांद्यालाही बाजारात ३० ते ४० रु पये किलोचा दर मिळत आहे. मात्र हा कांदा साठवून ठेवण्यासारखा नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडूनच हा कांदा खरेदी केला जात आहे आणि घरगुती वापरासाठी ग्राहक जुना कांदा खरेदी करणे पसंत करत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा