Onion growers worried | दरात घसरण; कांदा उत्पादक चिंतित

दरात घसरण; कांदा उत्पादक चिंतित

ठळक मुद्देबाजार समित्यांमध्ये वाढली आवक

वणी : दिवसेंदिवस लाल कांद्याच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादक चिंतित आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने बाजार समितीतील आवक वाढली असून, मागणीच्या प्रमाणात व्यवहारावर बंधने आल्याने दरावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी उपबाजारात कळवण, देवळा, सटाणा, चांदवड, दिंडोरी तालुक्यातील कांदा उत्पादक कांदा विक्र ीसाठी आणतात. त्यामुळे चांगली आवक होते. आर्थिक उलाढालीचे प्रमाणही लक्षणीय असते. पावसाळी पीक म्हणून परिचित लाल कांद्याचे एकरी उत्पादन तौलानिकदृष्ट्या कमी असते. जमिनीची प्रत रोगराई या बाबीचाही परिणाम पिकावर होत आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याच्या तुलनेत उत्पन्न कमी येते. हा कांदा साठवणुकीस अयोग्य असल्याने याचे व्यवहार करणे व्यापारीवर्गाला आर्थिकदृष्ट्या करणे बंधनकारक असते. अन्यथा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची भीती असते. त्यामुळे लाल कांद्याचे व्यवहार बाजारपेठेतील हालचाली बघून व्यापारीवर्ग दक्षतेने करतात. या खेपेस कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने उत्पादनात वाढ झाली. अपुºया मागणीमुळे दरात अस्थिरतेचे चित्र निर्माण झाले.
गेल्या पंधरा दिवसांपासून पुणा लोणंद भागातील रांगडा कांदा बाजारपेठेत दाखल झाल्याने मोठ्या खरेदीदारांनी तेथे आपला मोर्चा कांदा खरेदीसाठी वळविल्याची माहिती देण्यात आली. त्यात निर्यातबंदीच्या धोरणात्मक निर्णयामुळे लाल कांद्याची मागणी लालीअभावी कमी झाली आहे. परिणामी भूतकाळात आलेल्या तेजीच्या तुलनेत सध्या दर कमी मिळत असल्याची भावना उत्पादकांची झाली आहे. त्यामुळे उत्पादन व खर्च याचा ताळमेळ बसविण्याचे आव्हान उत्पादकांसमोर उभे ठाकले आहे. दुसरी बाब कांदा हे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढतो आहे, त्यात भूतकाळात बारा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. त्यामुळे उत्साहित व आशा पल्लवित झालेल्या उत्पादकांनी लागवड क्षेत्रात वाढ केली आहे. पाण्याची उपलब्धता व कसदार जमीन असली तर तीन ते साडेतीन महिन्यांत कांद्याचे पीक घेता येते. तसेच उर्वरित कालावधीत तीन पिके घेण्याचे नियोजन शेतकºयांना आखता येते, अशी माहिती उत्पादकांनी दिली.
मागणीत घट झाल्याचा परिणाम
लाल कांद्याच्या मागणीत घट आल्याचे कारण असे की, हा कांदा साठवणूक योग्य नसतो तसेच येत्या काही दिवसांत टिकाऊ स्वरूपाचा उन्हाळ कांदा बाजारात येईल. लाल कांद्याच्या तुलनेत भविष्यात उन्हाळ कांद्याची खरेदी साठवणूक यांचे नियोजन आखणारे व्यापारी उत्तरार्धाच्या कालावधीत लाल कांद्याच्या खरेदीसाठी तितकेसे उत्साहित नसल्याने व्यावहारिक उदासीनता आल्याची भावना उत्पादकांची झाल्याने व्यावहारिक ताळमेळ जमेनासा झाला आहे.

Web Title: Onion growers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.