राजापूर परिसरात कांदा लागवड सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:52 IST2020-08-22T18:51:27+5:302020-08-22T18:52:33+5:30
राजापूर : गाव परिसरात कांदा लागवड सुरु झाली आहे. मूगाचे शेत रिकामे झाल्याने व पाऊसानेही उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरु केली आहे.

राजापूर परिसरात कांदा लागवड सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : गाव परिसरात कांदा लागवड सुरु झाली आहे. मूगाचे शेत रिकामे झाल्याने व पाऊसानेही उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरु केली आहे.
यंदा अती पावसाने कांदा रोपे खराब झाली असल्याने याचा परिणाम लागवडीवर होणार आहे. बहुत्वांशी शेतकऱ्यांची शेत रिकामे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चार पायलीच्या रोपांमध्ये बिगाभर रान लागत आहे.
प्रती पायली दहा हजार रूपयांपेक्षा अधिक किंमतीने कांदा बी शेतकºयांनी विकत घेवून टाकले होते. आता, अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गाला लागवडी योग्य रोपे विकत घेणे परवडणारे नसल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित बिघडले आहे.
कांदा बियाणे प्रती किलो २ हजार ५०० ते २ हजार ८०० रु पयांनी बाजारात विक्र ी होत आहे. कांदा लागवड करताना यंदा शेतकºयांना मजूर टंचाईचाही सामना करावा लागतो आहे. कांदा लागवड नऊ हजार रु पये एकर प्रमाणे सुरू असल्याने शेतकºयांनी घरच्या घरी वा पडजी आडजीने कांदा लागवडीला पसंती दिली आहे. तर कांदा लागवड मजूरीचा दर हा दोनशे ते अडीचशे रु पये रोज झाला आहे.
(फोटो २२ राजापूर)