येवला तालुक्यात पोळ कांदा लागवड उदध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:26 IST2020-08-22T22:57:10+5:302020-08-23T00:26:09+5:30
येवला/जळगाव नेऊर : गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणातील बदलामुळे कांदा रोपांचे नुकसान झालेले असताना थोड्याफार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड सुरू आहे. बऱ्याच प्रमाणात कांदा रोपांची सड, कूज होत आहे. लावलेले कांदारोपे पीळ मारत असून करपाही मोठ्या प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

येवला तालुक्यातील पुरणगाव येथे कांदा लागवडीनंतर कूज झालेले कांदा रोपे दाखवताना शेतकरी.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला/जळगाव नेऊर : गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणातील बदलामुळे कांदा रोपांचे नुकसान झालेले असताना थोड्याफार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड सुरू आहे. बऱ्याच प्रमाणात कांदा रोपांची सड, कूज होत आहे. लावलेले कांदारोपे पीळ मारत असून करपाही मोठ्या प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
दहा ते बारा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने रोपांची पांढरी मुळी बंद झाली आहे. दहा ते बारा दिवसांपासून ऊनही पडलेले नाही, परिणामी रोपे व लावलेले कांदे पिवळे पडत असल्याने जमिनीतून पूरक खते व बुरशीनाशक व वरून महागड्या बुरशीनाशकांची फवारणीही सुरू आहे. आज येवला तालुक्यातील प्रत्येक शेतकºयाला कांदा लागवड, कांदा रोप वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
परिणामी मोठ्या प्रमाणात खर्च होत असून, लावलेला पोळ कांदा तग धरत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा लागवडीत नांगर घालण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकºयांनी पोळ कांद्यासाठी जमीन राखीव ठेवलेल्या आहेत; पण वातावरणातील बदलामुळे रोपेच सडून गेल्याने शेतकरी इतर पिके घेण्याची शक्यता आहे.
रोपे सडल्याने व लागवड केलेला कांदाही जमिनीत तग धरत नसल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होऊन उत्पादन घटणार असल्याने पोळ कांदा यंदा भाव खाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मी अडीच एकर क्षेत्रावर आठ दिवसांपूर्वी कांदा लागवड केली; मात्र लागवडीनंतर वातावरणातील बदलामुळे कांदा आपोआप जमिनीत पिवळा पडून जळत आहे. आठव्या दिवशीच औषधे फवारणी करून कांदा वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रमाणात खर्चर्ही होत आहे.
- राजेंद्र थेटे, कांदा उत्पादक शेतकरी