सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असणाऱ्या कांद्याला अकरा महिन्यांपासून कवडीमोल बाजार भाव मिळत असल्याने शेतक-यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. सायखेडा बाजार समितीत बुधवारी लाल कांद्याला २५० ते ३०० रूपये भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. मागील वर्षी मार्च महिन्यात कांद्याचे भाव गडगडले होते, तेव्हापासून तर आतापर्यंत भाव मिळाला नाही. काही दिवस थोडीफार वाढ झाली असली तरी त्या भाव वाढीचा फायदा अगदी कमी शेतकºयांना झाला होता.उन्हाळ कांदा बेभवात विक्र ी केल्यानंतर नवीन लागवड केलेल्या लाल कांद्याला भाव मिळेल अशी आशा शेतकºयांना होती. लाल कांदा केवळ २०० ते ४०० रूपये इतक्या कमी भावाने विकत आहे. सरासरी मात्र २५० ते ३०० रूपये भाव मिळत आसल्याने शेतकºयांना आपल्या शेतातून बाजार समितीच्या आवारात आणण्यासाठी येणारा खर्च वसूल होत नाही. कांदा काढणी एकरी सात हजार , कांदा वाहतूक खर्च किमान पाच हजार , गाडी भरणे एक हजार असा किमान पंधरा हजार रु पये खर्च येतो, तो देखील आताच्या बाजार भावात वसूल होत नसल्यामुळे शेतकºयांचे कमरडे मोडले आहे.
कांदा भावात घसरण सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 15:29 IST