Onion auction closed in district market committees | जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद

ठळक मुद्देव्यवहार ठप्प : केंद्र सरकारच्या साठवणूक मर्यादेवर घातलेल्या निणर्याचा निषेध, आवकही घटली

लासलगांव : केंद्र सरकारने साठवणुक मर्यादेवर घातलेल्या निणर्याच्या निषेधार्थ व्यापारी सहभागी न झाल्याने जिल्ह्यातील बाजार पेठांमध्ये सोमवारी कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले. विशेष म्हणजे आवकही झाली नसल्याचे बाजार समितीतफे सांगण्यात आले.

लासलगावी सोमवारी सकाळी कांदा घेऊन येणारी पिकअप जिप व ट्रॅक्टर्स आदी वाहने विक्रीस आलेली नाहीत. याबाबत लासलगाव बाजार समितीस अधिकृत व्यापारी अगर शेतकरी संघटनेचेव वतीने बंद बाबत अधिकृत पत्र प्राप्त झाले नाही अशी माहीती लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. विंचुर येथील कांदा उपआवारावर अवघी चार वाहने कांदा विक्रीस आलेला दिसुन आला.

कांदा निर्यातबंदी, आयकर तपासणीसत्र व त्यानंतर कांदा साठवणुकीवर आलेले निर्बंधांचे कारणामुळे जिल्ह्यातील व्यापारी केंद्र सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गाकडे नेहमीचे कांदा विक्री करणारे शेतकरी भावाची चौकशी करीत असतात.याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तर एकाच दिवशी सर्व बाजार आवारावर कांदा विक्रीस न आल्याने उत्पादकांनी माल विक्रीस न आणता एक प्रकारे शासकीय विविध निणर्याला विरोधच केल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. या ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातला आणि शेतक?्यांनी रब्बीचा साठवून ठेवलेला कांदा खराब झाला आहे. साधारणपणे आद्रर्तेनुसार चाळीत साठवलेला कांद्याचे नुकसान ३५ ते ४० टक्के असते. यावर्षी अतिवृष्टीमुळे आद्रर्ता जास्त असल्याने साठलेल्या कांद्याचे प्रमाणापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
निर्यातबंदी लावल्यानंतर राज्यात एकूण १ लाख ४० हजार टन कांद्याची आवक झाली आहे. त्यापैकी अहमदनगरमधून सुमारे २५ हजार टन, नाशिकमधून ८० हजार टन आणि पुण्यातून १३ हजार टन आवक झाली आहे. तसे पहाता एकूण उत्पादनापैकी खरीपात सुमारे १० ते २० टक्के उत्पादन होते. उशीराच्या खरीपात ३५ ते ४० टक्के उत्पादन होते आणि रब्बीनंतर ५० ते ६० टक्के कांद्याची उत्पादन होते. रब्बीत जरी सर्वाधिक उत्पादन होत असले तरी सगळा कांदा विकला.

 

Web Title: Onion auction closed in district market committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.