निंबाळे येथे शेतीच्या वादातुन एकाचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:02 IST2020-11-25T00:01:05+5:302020-11-25T00:02:53+5:30

निंबाळे येथे शेतीच्या वादातुन चार जणांनी एकास बेदम मारहाण करुन त्यांचे डोके फोडल्याची फिर्याद महेंद्र निवृत्ती सोनवणे (३०) यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. यावरून गुन्हा दाखल केला आहे.

One was beheaded in a farm dispute at Nimbale | निंबाळे येथे शेतीच्या वादातुन एकाचे डोके फोडले

निंबाळे येथे शेतीच्या वादातुन एकाचे डोके फोडले

चांदवड : तालुक्यातील निंबाळे येथे शेतीच्या वादातुन चार जणांनी एकास बेदम मारहाण करुन त्यांचे डोके फोडल्याची फिर्याद महेंद्र निवृत्ती सोनवणे (३०) यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. यावरून गुन्हा दाखल केला आहे. सोमवार दि. २३ नोंव्हेबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास महेंद्र निवृत्ती सोनवणे यांचा व निंबाळे येथील हरीभाऊ कोंडाजी सोनवणे यांच्यात शेतीचा वाद असून महेंद्र हे समजावुन सांगत असतांना भांडणाची कुरापत काढून हरीभाऊ सोनवणे, गोरख रंगनाथ सोनवणे, नामदेव शंकर सोनवणे , माणिक शंकर सोनवणे सर्व रा. निंबाळे यांनी महेंद्र यास हाताचे चापटीने व लाथा बुक्याने मारहाण केली व पत्नी आशा हिलापण मारहाण केली. यात महेंद्र यांचे डोक्यावर दगडाने मारुन जबर जखमी केल्याने महेंद्र सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चांदवड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हवालदार नरेंद्र सौंदाणे हे करीत आहेत.

Web Title: One was beheaded in a farm dispute at Nimbale