बिलवाडी शाळेचे एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 08:49 PM2020-08-12T20:49:22+5:302020-08-13T00:11:43+5:30

अभोणा : कळवण तालुक्यातील बिलवाडी अतिदुर्गम दोन पाड्यांचे गाव. गावातील बहुतेक पालकांचे वास्तव्य शेतात. सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं गाव.. त्यामुळे गावात कोणतेही नेटवर्क नाही, तर काही ठिकाणी अगदी कमी वेगाचे नेटवर्क...

One step towards self-reliance of Bilwadi school! | बिलवाडी शाळेचे एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे !

कळवण येथे शाळेसाठी जगन साबळे, लक्ष्मण गायकवाड, सोमनाथ गायकवाड, भास्कर गायकवाड यांच्याकडून शाळेसाठी पेनड्राइव्ह स्वीकारताना मुख्याध्यापक रणधीर बस्ते, रामचंद्र वाडीले.

Next
ठळक मुद्देशाळा बंद शिक्षण सुरू : अतिदुर्गम पाड्यात विद्यार्थ्यांना आॅनलाइन धडे

लोकमत न्यूज नेटवर्क
अभोणा : कळवण तालुक्यातील बिलवाडी अतिदुर्गम दोन पाड्यांचे गाव. गावातील बहुतेक पालकांचे वास्तव्य शेतात. सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं गाव.. त्यामुळे गावात कोणतेही नेटवर्क नाही, तर काही ठिकाणी अगदी कमी वेगाचे नेटवर्क...
कोरोना महामारीत ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ ही अभ्यासमाला जिल्ह्यात सुरू करण्यात आली. पालकांचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केलेत. परंतु पालकांना नेटवर्क शोधण्यासाठी गावभर फिरावे लागत असे, नाहीतर टेकड्यांवर जाऊन शिक्षकांनी पाठविलेली अभ्यासमाला डाउनलोड करण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. कधीतरी नेटवर्क मध्ये आल्यावर अभ्यासमाला व इतर आॅनलाइन शैक्षणिक साहित्य मिळायचे, अशा परिस्थितीत शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचलेच पाहिजे ही तळमळ काही शांत बसू देत नव्हती. त्यातूनच शिक्षकांनी विस्तार अधिकारी संजय चव्हाण यांच्या मार्गदशर्नाखाली येथे एक अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.
गावातील स्मार्ट टेलिव्हिजन व मोबाइल असलेल्या पालकांची यादी तयार केली. उपशिक्षक रामचंद्र वाडिले यांनी एक पेनड्राइव्ह त्या स्मार्ट टेलिव्हिजन व स्मार्ट मोबाइलला जोडणी करून आॅफलाइन अध्यापन व अध्ययन करता येते याचे प्रात्यक्षिक दाखविले ते पाहून शाळेचे मुख्याध्यापक रणधीर बस्ते यांनी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक बोलावली. सदर उपक्रमाचे प्रात्यक्षिक परत करून घेतले. यावेळी उपस्थिताना पेन ड्रॉइव्ह दान करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.
पालक स्वत: पेनड्राइव्ह खरेदी करून पाल्यासाठी कोरोनाकाळात आत्मनिर्भरतेने शिक्षण सुरू करू लागले आहेत. उपक्रमासाठी चिंचपाडा (जा) बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी एस.डी. चव्हाण, केंद्रप्रमुख श्रीमती एस.के. गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले .शैक्षणिक पाठशिक्षकांनी वर्गाचा अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक पाठाचे सादरीकरणाचा व्हिडिओ, स्वाध्याय, विविध उपक्रम डाऊनलोड करून घेतले. शिक्षणाचे नियोजन केले. ्यका विद्यार्थ्याकडे दोन दिवस एक पेन ड्राइव्ह स्मार्ट टेलिव्हिजन व फोनला जोडणी करून विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आॅफलाइन आत्मनिर्भरतेने शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

Web Title: One step towards self-reliance of Bilwadi school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.