मोहाडी ग्रामस्थांकडून शहीद कुटुंबीयांना एक लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 18:06 IST2019-02-26T18:05:11+5:302019-02-26T18:06:45+5:30
दिंडोरी : जम्मु काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील गोवर्धनपाडा व मलकापूर येथील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मोहाडी ग्रामस्थांच्यावतीने एक लाख रु पयांची मदत करण्यात आली.

मोहाडी ग्रामस्थांकडून शहीद कुटुंबीयांना एक लाखाची मदत
ठळक मुद्देशिवजयंतीची मिरवणूक न काढता गोळा करण्यात आलेली वर्गणी शहीद झालेल्या कुटुंबियांना
दिंडोरी : जम्मु काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील गोवर्धनपाडा व मलकापूर येथील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मोहाडी ग्रामस्थांच्यावतीने एक लाख रु पयांची मदत करण्यात आली.
मोहाडी व पंचक्र ोशीतील नागरिकांनी शिवजयंतीची मिरवणूक न काढता गोळा करण्यात आलेली वर्गणी शहीद झालेल्या कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन प्रत्येकी ५१ हजार रु पये देण्यात आले. यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे सागर पाटील, किरण देशमुख, प्रवीण जाधव, गोपीनाथ देशमुख, अजिंक्य सोमवंशी, निखिल जाधव आदी उपस्थित होते.