कादवाचे एक लाख मेट्रीक टन उसाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 19:15 IST2020-01-22T19:15:09+5:302020-01-22T19:15:46+5:30
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याची गाळप कार्यक्षमता वाढत कमी दिवसात एक लाख उसाचे गाळप झाल्याने दिंडोरी, पालखेड, चिंचखेड, दहेगाव, मडकीजाम, ओझरखेड आदी विविध गावाच्या शेतकऱ्यांनी कादवा कारखान्यास भेट देत संचालक मंडळ, अधिकारी कामगार यांचे कौतूक केले.

कादवा कारखान्याची गाळप कार्यक्षमता वाढल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांचा सत्कार करताना माजी संचालक शिवाजीराव जाधव, शेतकरी संघाचे अध्यक्ष दिलीप जाधव, गुलाब जाधव, विश्वास देशमुख, सोमनाथ सोनवणे, सदानंद जाधव आदी शेतकरी.
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याची गाळप कार्यक्षमता वाढत कमी दिवसात एक लाख उसाचे गाळप झाल्याने दिंडोरी, पालखेड, चिंचखेड, दहेगाव, मडकीजाम, ओझरखेड आदी विविध गावाच्या शेतकऱ्यांनी कादवा कारखान्यास भेट देत संचालक मंडळ, अधिकारी कामगार यांचे कौतूक केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याचे आधुनिकीकरणाचे काही कामे पूर्ण होत गाळप कार्यक्षमता दुपटीने वाढली आहे .
रविवारी (दि.१९) विक्र मी २८४८ मेट्रीक टन गाळप झाले. कादवाचे यंदाचे गळीत हंगामात ४८ व्या दिवसखेर १०२७१६ मेट्रीक टन उसाचे गाळप होत ११३७०० क्विंटल साखर निर्मिती झाली असून सरासरी ११.३३ टक्के साखर उतारा आहे.
विविध गावच्या शिष्टमंडळाने कादवाचे कामकाजाची माहिती घेत ऊसतोड व उसलागवडी बाबत चेअरमन श्रीराम शेटे व संचालक मंडळासोबत सविस्तर चर्चा केली. शेटे यांचा यावेळी शेतकºयांनी सत्कार केला.
यावेळी दिंडोरीचे विश्वास देशमुख, माजी संचालक शिवाजी जाधव, संचालक दिनकर जाधव, बाळासाहेब जाधव, मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, बापू पडोळ, खरेदी विक्र ी संघाचे चेअरमन दिलीप जाधव, गुलाब जाधव, सदानंद जाधव, रघुनाथ जगताप, सर्व संचालक आदींसह शेतकरी उपस्थित होते.