सिन्नरला कंपनीत एक लाख ८५ हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:30 IST2019-03-30T13:30:25+5:302019-03-30T13:30:36+5:30
सिन्नर : उद्योग भवन येथील गती एक्स्प्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामाचे शटर अज्ञात चोरट्यांनी हत्याराने उचकावून एक लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास केला.

सिन्नरला कंपनीत एक लाख ८५ हजारांची चोरी
सिन्नर : उद्योग भवन येथील गती एक्स्प्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामाचे शटर अज्ञात चोरट्यांनी हत्याराने उचकावून एक लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास केला. गुरूवार (दि. २८) रोजी रात्री ही घटना घडली. याबाबत भारत मधुसूदन डिचोलकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गती एक्स्प्रेसमध्ये आॅनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांचे बॉक्स वितरणासाठी आले होते. गुरूवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास या कंपनीच्या गोदामामध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे बॉक्स, वाहनाच्या स्पेअरपार्ट बॉक्स, विमानाचे पार्ट असा सुमारे एक लाख ८५ हजार १५३ रूपयांचा ऐवज लंपास केला.