One killed by unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेने एक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेने एक ठार

मालेगाव मध्य: शहरालगतच्या मुंबई आग्रा महामार्गावर लब्बैक हॉटेल जवळ बुधवारी रात्री बाराच्या सुमारास दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोस दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला. इमरान खान निसार खान रा.पवारवाडी याने पवारवाडी पोलिसांना अपघाताची माहिती दिली.महामार्गावरील माळधे शिवारातील हॉटेल लब्बैक जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार निसार खान बुढन खान (५६) रा.पवारवाडी यांच्या डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाले तर शेख खलील शेख शब्बीर (४०) रा.रशीद नगर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.मृत निसार खान यांच्या पश्चात पत्नी व पाच मुले असा परिवार होत. (१९ निसार खान)

Web Title:  One killed by unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.