नांदूरशिंगोटे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 16:55 IST2021-08-10T16:54:00+5:302021-08-10T16:55:24+5:30
नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोडी खुर्द येथील रोहिदास रामनाथ गुळवे (२५) हे जागीच ठार झाल्याची घटना घडली.

नांदूरशिंगोटे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोडी खुर्द येथील रोहिदास रामनाथ गुळवे (२५) हे जागीच ठार झाल्याची घटना घडली.
रविवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान दोडी खुर्द (रामोशी वाडी) येथील रोहिदास गुळवे यांना नांदूरशिंगोटे शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मोलमजुरी करणाऱ्या गुळवे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनाविरोधात वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.