रेल्वेच्या धडकेत ओढ्याजवळ एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 22:17 IST2019-09-07T22:17:24+5:302019-09-07T22:17:41+5:30
नाशिक : मुंबईकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमार्गावर ओढा परिसरात रेल्वेच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली. रामदास मोहन वाघमारे (४९) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मांडसांगवी येथील माळवाडीचे रहिवासी आहेत.

रेल्वेच्या धडकेत ओढ्याजवळ एक ठार
ठळक मुद्दे सकाळी ८ वाजेच्या सुमारास रामदास वाघमारे मृत्यावस्थेत आढळून आले.
नाशिक : मुंबईकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमार्गावर ओढा परिसरात रेल्वेच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली. रामदास मोहन वाघमारे (४९) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मांडसांगवी येथील माळवाडीचे रहिवासी आहेत.
डाउन रेल्वेमार्गावरील पोल नंबर १९४/३१ व १९५/३१ दरम्यान शिलापूर उड्डाणपुलाखाली गुरुवारी (दि.५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास रामदास वाघमारे मृत्यावस्थेत आढळून आले. रेल्वेची जोरदार धडक बसून शरीराचे दोन तुकडे झाले होते. तसेच डावा हात तुटून डोक्यास व चेहºयास गंभीर मार लागून दुखापत झाल्याने वाघमारे यांचा मृत्यू झाला.