राहुड गावाजवळ ट्रेलरच्या अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 19:49 IST2018-08-12T19:48:52+5:302018-08-12T19:49:05+5:30
चांदवड : मुंबई - आग्रा रोडवर राहुड गावाजवळ शुक्रवारी (दि.१०) रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास पुढे जाणाऱ्या ट्रेलरने (क्र. आरजे ०७ जीसी ६७७५) अचानक बे्रक लावल्याने मागून येणारा ट्रेलर (क्र. आरजे ०७ जीबी ३३३५) आदळून चालक मांगीलाल सईराम विष्णई (रा.राजस्थान) जागीच ठार झाला.

राहुड गावाजवळ ट्रेलरच्या अपघातात एक ठार
चांदवड : मुंबई - आग्रा रोडवर राहुड गावाजवळ शुक्रवारी (दि.१०) रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास पुढे जाणाऱ्या ट्रेलरने (क्र. आरजे ०७ जीसी ६७७५) अचानक बे्रक लावल्याने मागून येणारा ट्रेलर (क्र. आरजे ०७ जीबी ३३३५) आदळून चालक मांगीलाल सईराम विष्णई (रा.राजस्थान) जागीच ठार झाला. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला ट्रेलरचालक धनपतराव नेहरचंद विष्णई याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, कैलास जगताप करीत आहेत.