विंचूरनजीक अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:57 IST2018-02-10T00:57:35+5:302018-02-10T00:57:47+5:30

विंचूर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील विंचूरनजीक असलेल्या विष्णूनगरजवळ टेम्पो आणि पिकअप यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार, तर १९ जखमी झाले.

One killed in a road accident | विंचूरनजीक अपघातात एक ठार

विंचूरनजीक अपघातात एक ठार

विंचूर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील विंचूरनजीक असलेल्या विष्णूनगरजवळ टेम्पो आणि पिकअप यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार, तर १९ जखमी झाले. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना निफाड व नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात मनोज एकनाथ गांगुर्डे (२२ रा.कानड, ता. चांदवड) जागीच ठार झाले आहे. येथील एमआयडीसीजवळील म्हसोबा माथ्यावर धार्मिक कार्यक्र म आटोपून येवला तालुक्यातील नागडे येथील भाविक घरी परतत होते. विष्णुनगरनजीक ओव्हरटेक करताना टेम्पो आणि पिकअप यांच्यात अपघात झाला. गंभीर जखमींना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींमध्ये सात पुरुष, सहा महिला आणि सहा लहान मुलांचा समावेश आहे. अपघाताचे वृत्त समजताच निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिºर्हे, लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्यासह पोलिस कर्मचारी घुगे, शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: One killed in a road accident

टॅग्स :Accidentअपघात