मालेगावजवळ तीन खासगी बसच्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:27 IST2018-09-23T01:26:55+5:302018-09-23T01:27:14+5:30

मालेगाव मनमाड रस्त्यावर तीन खासगी बसच्या झालेल्या अपघातामध्ये एक चालक ठार झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही.

 One killed in a private bus accident near Malegaon | मालेगावजवळ तीन खासगी बसच्या अपघातात एक ठार

मालेगावजवळ तीन खासगी बसच्या अपघातात एक ठार

मालेगाव : मालेगाव मनमाड रस्त्यावर तीन खासगी बसच्या झालेल्या अपघातामध्ये एक चालक ठार झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही.  शनिवारी रात्री १२.३०च्या सुमारास पुण्याहून मालेगावकडे जाणारी खासगी बस (क्रमांक एमपी ३०पी २१३) ला समोरून येणाऱ्या अन्य एका खासगी बसची धडक बसली. या पाठोपाठ आणखी एक खासगी बस या बसेसवर आदळली. या तिहेरी अपघातात एका बसचा चालक ठार झाला तर १३ जण जखमी झाले. जखमींना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करºयात आले आहे. या जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
अपघाताचे वृत्त समजताच पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. तसेच त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

Web Title:  One killed in a private bus accident near Malegaon

टॅग्स :Accidentअपघात