जीप-दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 23:01 IST2021-12-01T22:59:00+5:302021-12-01T23:01:19+5:30
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर आगासखिंडजवळ मंगळवारी (दि.१) दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकी व जीप यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

जीप-दुचाकी अपघातात एक ठार
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर आगासखिंडजवळ मंगळवारी (दि.१) दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकी व जीप यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
वैभव मोहन शेळके (१९, रा. आगासखिंड) असे मृत युवकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वैभव शेळके, सौरभ सुनील जगताप (१८) व निखिल विक्रम जगताप (१८, सर्व रा. आगासखिंड, ता. सिन्नर) हे तिघेजण दुचाकीहून (एम एच १५ एचएफ १८५४) बेलू येथून आगासखिंडकडे जात होते. याच दरम्यान पांढुर्लीकडून बेलूच्या दिशेने जाणारी जीप (एम एच १७ बीएस ००३०) व दुचाकी या दोन्ही वाहनांची समोरासमोर ठोस होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात वैभव जागीच ठार झाला. निखिल जगताप व सौरभ जगताप हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पांढुर्ली दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जी. डी. परदेशी, पोलीस नाईक आहेर, नवनाथ शिरोळे पुढील तपास करीत आहेत.