जनशताब्दी एक्स्प्रेसचा धक्का लागून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 01:04 AM2021-10-11T01:04:32+5:302021-10-11T01:05:35+5:30

मध्य रेल्वेच्या मुंबई-नाशिक रेल्वे मार्गातील अस्वली स्थानकादरम्यान रविवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास रेल्वे एक्स्प्रेसचा मार लागल्यामुळे एका अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू झाला.

One killed in Janshatabdi Express collision | जनशताब्दी एक्स्प्रेसचा धक्का लागून एकाचा मृत्यू

जनशताब्दी एक्स्प्रेसचा धक्का लागून एकाचा मृत्यू

googlenewsNext

इगतपुरी : मध्य रेल्वेच्या मुंबई-नाशिकरेल्वे मार्गातील अस्वली स्थानकादरम्यान रविवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास रेल्वे एक्स्प्रेसचा मार लागल्यामुळे एका अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसचा एका ३० वर्षीय इसमास मार लागून जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या इसमाची अद्यापही ओळख पटली नसून सदर इसमाची उंची ५ फूट, रंगाने सावळा, चेहरा गोल, शरीरबांधा मध्यम, नाक सरळ, केस काळे, मिशा वाढलेल्या, अंगात काळ्या रंगाची जीन्स, दोन्ही हातात भगवा रंगाचा धागा असे या इसमाचे वर्णन असून सदर इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

Web Title: One killed in Janshatabdi Express collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.