म्हैसवळण घाटात भीषण अपघात एकाचा मृत्यु तर चौघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:06 IST2021-04-01T23:04:08+5:302021-04-02T01:06:37+5:30
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी-अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील म्हैसवळणघाटात गुरुवारी सांयकाळी भीषण अपघात होऊन त्यात एक जण ठार झाला असून, चार ते पाच जण गंभीर जखमी झशले आहेत. जखमींना एस एम बी टी हॉस्पिटल, धामणगाव येथे दाखल करण्यात आले आहे.

म्हैसवळण घाटात भीषण अपघात एकाचा मृत्यु तर चौघे गंभीर जखमी
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी-अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील म्हैसवळणघाटात गुरुवारी सांयकाळी भीषण अपघात होऊन त्यात एक जण ठार झाला असून, चार ते पाच जण गंभीर जखमी झशले आहेत. जखमींना एस एम बी टी हॉस्पिटल, धामणगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
अकोले तालुक्यातील खिरविरे येथे कॉन्क्रीटच्या कामासाठी नाशिक येथून सुमारे पंचवीस मजूर गेले होते. एम. एच. ०४ ई. जी. ८३७८ क्रमांकाच्या ४०७ टेम्पो मधून सदरचे परराज्यातील मंजूर नाशिककड़े जात असतांना म्हैसवळणघाटाचा तिव्र उतार व अवघड वळणावर ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने रोड डिव्हाडरला धडकून टेम्पोने तीन ते चार पलटी मारून तो खोल दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला आहे.
गाडीमध्ये लोखंडी साहीत्य असल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. ईगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी हे याच रस्त्याने येत असतांना त्यांना हा अपघात दिसताच त्यांनी सर्वत्र फोन करुन ॲम्बुलन्स बोलवल्या. व पोलिस स्टेशनला खबर देण्यात आली. घोटी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, घुमसे व परिसरातील ग्रामस्थ राम शिंदे आदींनी जखमीना एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव येथे उपचारार्थ दाखला करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहे. (०१ टाकेद)