चांदवडला अज्ञात वाहनाच्या धडकेने एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 18:29 IST2019-10-14T18:27:53+5:302019-10-14T18:29:20+5:30
चांदवड तालुक्यातील मंगरुळ चौफुलीवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक पादचारी ठार झाला.

चांदवडला अज्ञात वाहनाच्या धडकेने एक जण ठार
चांदवड : तालुक्यातील मंगरुळ चौफुलीवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक पादचारी ठार झाला.
चांदवड तालुक्यातील तळवाडे येथील लक्ष्मण नामदेव काटे हे वृध्द रस्त्याने पायी जात असतांना आग्रारोडने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.