कार-दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 01:11 IST2020-12-14T23:22:46+5:302020-12-15T01:11:16+5:30
इगतपुरी : मुंबईहून इगतपुरी शहरात जोरात येणाऱ्या सुझुकी कंपनीच्या झेन एस्टीलो कारने मोटारसायकलला समोर धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. १४) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारात इगतपुरी न्यायालयाच्या समोर घडली.

मयत प्रशांत प्रकाश मोरे.
इगतपुरी : मुंबईहून इगतपुरी शहरात जोरात येणाऱ्या सुझुकी कंपनीच्या झेन एस्टीलो कारने मोटारसायकलला समोर धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. १४) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारात इगतपुरी न्यायालयाच्या समोर घडली.
सविस्तर वृत्त असे की, इगतपुरी न्यायालयासमोर मुंबईहून इगतपुरी शहरात भरवेगात येणारी सुझुकी कंपनीची झेन एस्टीलो
कार (एम. एच. १५ बी. एक्स ५५३७) ही समोरून येत असताना मोटारसायकल होंडा शाईन (एम. एच. १५ ई. सी. ९५६६) ला ठोस मारल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला.
या घटनेत कारचालक वयोवृद्ध असून, शेखर वेणुगोपाल हत्तगंडी (६६, रा. मुंबई) यांनी वाहन वेगात सुरू ठेवल्याने मोटारसायकलस्वार प्रशांत प्रकाश मोरे (३४, रा. शिवनेरी कॉलनी, रेल्वे पॉवर हाऊस) हा गाडीखाली घसरून चिरडला गेला. या घटनेची माहिती स्थानिक युवकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने प्रशांत याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय सूत्रांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक शरद सोनवणे व पोलीस कर्मचारी सचिन देसले, गणेश वराडे आदी तपास करीत आहे.
दोन दिवसांपासून इगतपुरीत पावसाच्या सरी सुरू असल्याने रस्ते ओले झाले आहेत. त्यात ठिकठिकाणी खड्डे तयार होऊन त्या खड्ड्यात पाणी साचले असून या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना अलीकडेच घडल्याने तसेच न्यायालय व जोगेश्वरी येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.
पादचारी व वाहनधारक आपला जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील जुन्या मुंबई महामार्गाच्या रस्त्याची चाळण झाली असताना नेते मंडळी व लोकप्रतिनिधी डोळेझाक करीत सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणताही जाब विचारत नसल्याने आणखी किती बळी घेणार, अशी खंत शहरातील नागरिकांनी व्यक्त करीत आहे.