वाडीव-हेजवळ अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 16:19 IST2020-05-20T16:19:49+5:302020-05-20T16:19:58+5:30

वाडीव-हे : नाशिकहून वाडीव-हेकडे जाणाऱ्या दुचाकीस पाठी मागुन येणाºया अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

 One killed in an accident near Wadiv-Hej | वाडीव-हेजवळ अपघातात एक ठार

वाडीव-हेजवळ अपघातात एक ठार

वाडीव-हे : नाशिकहून वाडीव-हेकडे जाणाऱ्या दुचाकीस पाठी मागुन येणाºया अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग येथील शिवराम सोमा वारघडे (२८) आणि दशरथ वाळू खडके (३०) रा .रायगड नगर हे दोघे हिरो होंडा स्प्लेंडर क्र मांक एम एच १५ डी डब्ल्यू १२९४ या दुचाकीने वाडीवºहेकडे जात होते. सकाळी आठ वाजेच्या दरम्यान वाडीºहेजवळ पाठीमागून येणाºया अज्ञात वाहनाने या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. त्यामध्ये पाठीमागे बसलेले दशरथ वाळू खडके रा रायगड नगर ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या गोंदे फाटा येथील मोफत रु ग्णवाहिकेने जखमींना नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात तात्काळ दाखल केले, परंतु डॉक्टरांनी दशरथ खडके यास तपासून मृत घोषित केले. तर शिवराम वारघडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहन घेऊन फरार झाला. याप्रकरणी वाडीव-हे पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.नि.विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

Web Title:  One killed in an accident near Wadiv-Hej

टॅग्स :Nashikनाशिक