कोटंबी गावाजवळ अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:35 IST2019-05-08T00:34:25+5:302019-05-08T00:35:29+5:30

पेठ : तालुक्यातील कोटंबी गावानजीक बस थांब्याजवळ ट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.

One killed in an accident near Kotbi village | कोटंबी गावाजवळ अपघातात एक ठार

कोटंबी गावाजवळ अपघातात एक ठार

ठळक मुद्देपेठ पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पेठ : तालुक्यातील कोटंबी गावानजीक बस थांब्याजवळ ट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.
नाशिक ते पेठ राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, कोटंबी गावाजवळ एकेरी वाहतूक सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी ट्रकने (क्र टीएन ५२ ई ६७३३) समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (क्र. एमएच१५ जीएस ६४९०) धडक दिली. यामध्ये डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महादू सयाजी चौधरी (६५), रा. म्हसगण हे जागीच ठार झाले, तर दुचाकीवरील ज्ञानेश्वर मोतीराम गायकवाड (२७), रा. नडगदरी, हौसाबाई त्र्यंबक भुसारे (५५), रा. पवारपाडा गंभीर जखमी झाले. कोटंबी गावातील नागरिकांनी धाव घेत जखमींना रचग्णलयात हलवले. पेठ पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: One killed in an accident near Kotbi village

टॅग्स :Accidentअपघात