गोंदे फाट्याजवळ अपघात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:54 IST2020-05-09T18:29:20+5:302020-05-10T00:54:34+5:30
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथील एका हॉटेलजवळ झालेल्या अपघातात एक जण उपचारादरम्यान ठार झाल्याची घटना शुक्र वारी (दि.८) रोजी राञी सव्वा आठच्या सुमारास घडली आहे.

गोंदे फाट्याजवळ अपघात एक ठार
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथील एका हॉटेलजवळ झालेल्या अपघातात एक जण उपचारादरम्यान ठार झाल्याची घटना शुक्र वारी (दि.८) रोजी राञी सव्वा आठच्या सुमारास घडली आहे. नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथे एका हॉटेलजवळ बाजूला थांबलेल्या ट्रक क्र मांक (एम.एच.४०, ४८५४) या वाहनाला मागून नाशिकहून मुंबईकडे आपल्या स्कुटी क्र मांक (एम.एच. १५, एफटी. ३१७६) भरधाव वेगाने जात असतांना स्कुटीस्वाराने जोरदार धडक दिल्याने या झालेल्या अपघातात स्कुटीस्वार लक्ष्मण सोमा गहिरे (५६, रा. रायगडनगर ता.इगतपुरी) हे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्र वारी राञी सव्वा आठच्या सुमारास घडली. गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांना सदर अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल होत अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस नाशिक येथील खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सदर व्यक्तीला मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघाताचा पुढील तपास वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्विजत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे.