आंबेगण फाट्याजवळ अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 00:45 IST2021-06-20T23:39:59+5:302021-06-21T00:45:25+5:30
दिंडोरी : तालुक्यातील आंबेगण फाट्याजवळ होंडा वीगो कंपनीच्या दुचाकीचा अपघात होऊन राहुल नरेंद्र वाघ (रा. झरलीपाडा, ता. दिंडोरी) हा जागीच ठार झाला.

आंबेगण फाट्याजवळ अपघातात एक ठार
दिंडोरी : तालुक्यातील आंबेगण फाट्याजवळ होंडा वीगो कंपनीच्या दुचाकीचा अपघात होऊन राहुल नरेंद्र वाघ (रा. झरलीपाडा, ता. दिंडोरी) हा जागीच ठार झाला.
नाशिक-धरणपूर नॅशनल हायवेवर आंबेगण फाट्याजवळ शनिवारी (दि. १९) रात्री १२ वाजेच्या सुमारास राहुल वाघ हा झरली येथून नाशिककडे निघाला असता रस्त्यात अनोळखी वाहनाने त्यास धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर युवकाची दुचाकी आंबेगण फाट्याजवळ लावलेली आढळली. त्यामुळे मृताच्या नातेवाइकांनी याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पजई व गायकवाड हे अधिक तपास करत आहेत.