कानडी मळ्यातील अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:35 IST2019-10-09T23:33:53+5:302019-10-09T23:35:24+5:30
सिन्नर : सिन्नर-बारागावपिंप्री रस्त्यावर कानडी पेट्रोलपंपाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार, तर अन्य एक जखमी झाल्याची घटना घडली.

कानडी मळ्यातील अपघातात एक ठार
सिन्नर : सिन्नर-बारागावपिंप्री रस्त्यावर कानडी पेट्रोलपंपाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार, तर अन्य एक जखमी झाल्याची घटना घडली. कानडी मळ्यातील विशाल सुधाकर दातरंगे (२३) हा युवक दुचाकीने आईला घेऊन पिंप्री रस्त्यावरील खिंडीतील देवी मंदिरात जात होता. मात्र दुचाकी पडल्याने आई किरकोळ जखमी झाली. त्यामुळे घरून चारचाकी किंवा रिक्षा घेऊन येतो असे म्हणून विशाल परत दुचाकीहून घराकडे येत होता. त्यावेळी एक दुचाकी कानडी मळ्याकडे वळत असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात विशाल दातरंगे जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दुसऱ्या दुचाकीवरील चालक जखमी झाला आहे.