दिघोळे विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 23:20 IST2021-07-17T23:20:13+5:302021-07-17T23:20:49+5:30

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील टी. एस. दिघोळे माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला

One hundred percent result of Dighole Vidyalaya | दिघोळे विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

दिघोळे विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

ठळक मुद्देसाक्षी जेजुरकर विद्यालयात प्रथम आली आहे.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील टी. एस. दिघोळे माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला असून, साक्षी जेजुरकर विद्यालयात प्रथम आली आहे. विद्यालयातून ५० विद्यार्थ्यांपैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात साक्षी दत्तात्रय जेजुरकर (९५.८०) आसावरी दीपक पवार (९५.००) द्वितीय, संजीवनी पांडुरंग चेवले (९०.२०) तृतीय, तर ओमकार लक्ष्मण केदार (८६.२०) चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे. भाग्यश्री ज्ञानेश्वर कमोद (८६.००) अनुष्का शिवाजी कातकाडे (८५.८०) अनुक्रमे पाचवे व सहाव्या स्थान पटकावले आहे.

Web Title: One hundred percent result of Dighole Vidyalaya