भगूर नूतन शाळेचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:41 IST2020-07-18T21:37:58+5:302020-07-19T00:41:56+5:30

भगूर : भगूर शिक्षण मंडळ संचलित नूतन विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक देवळाली कॅम्प शाळेचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली.

One hundred percent result of Bhagur New School | भगूर नूतन शाळेचा निकाल शंभर टक्के

भगूर नूतन शाळेचा निकाल शंभर टक्के

भगूर : भगूर शिक्षण मंडळ संचलित नूतन विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक देवळाली कॅम्प शाळेचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली.
देवळाली कॅम्प शाळेचा बारावीचा निकाल कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचा निकाल पुढीलप्रमाणे- कला शाखेचा ८३.१६ टक्के निकाल लागला. १९६ विद्यार्थ्यांपैकी १६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य विभागाचा निकाल १०० टक्के लागला. एकूण १५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतील ८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाखानिहाय प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : कला शाखा- शुभांगी शिंदे (७५.८४), वैष्णवी चौधरी (७१.५३), शालिनी तुपे (७१.३८), वाणिज्य शाखा- माधुरी आडके (८८.३०), धनंजय देशमुख (८६.००), अभिषेक तळपदे (८४.७६), विज्ञान शाखा- अविनाश जाधव (८०.६०), वैष्णवी दळवी (७९.६०), शिवानी पुंडे (७६.९०).

Web Title: One hundred percent result of Bhagur New School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक