‘एक शाम भगवान महावीर के नाम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:50 IST2018-03-29T00:50:07+5:302018-03-29T00:50:30+5:30
जैन सोशल ग्रुप सेंट्रल (जेएसजी) च्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त ‘एक शाम भगवान महावीर के नाम’ हा मुंबई येथील गायक दक्षेशभाई शाह आणि सहकारी यांच्या भक्तिसंगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘एक शाम भगवान महावीर के नाम’
नाशिक : जैन सोशल ग्रुप सेंट्रल (जेएसजी) च्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त ‘एक शाम भगवान महावीर के नाम’ हा मुंबई येथील गायक दक्षेशभाई शाह आणि सहकारी यांच्या भक्तिसंगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.गंगा पूररोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात जेएसजीतर्फे आयोजित या भक्तिसंगीत कार्यक्रमात दक्षेशभाई शाह यांनी ‘तू मने भगवान है’, ‘वरद आप दे’, ‘वर्तमान मे वर्धमान की आवश्यकता है’, ‘हे नाथ तू कृपा कर दे’ अशा अनेक भक्तीमय रचना सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वीराज बोरा, महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार, मिट टाऊनचे अध्यक्ष मनीष मोदी, पूर्णिमा सराफ, रविवारकारंजा स्थानकचे जे.सी. भंडारी, सचिन शाह, अरुण मुनोत आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय मंचरकर यांनी केले. स्वागत सुभाष भंडारी यांनी केले. प्रास्तविक शारदा भंडारी यांनी केले. याप्रसंगी शुभदा बोरा, पवन बेदमुथा, नितीन भंडारी, राजेंद्र कुचेरिया, मीना भटेवरा, संदीप गोठी, रवींद्र पारख, हितेश शाह, आनंद कांकरिया, जितेंद्र चोरडिया, पंकज भटेवरा आदि उपस्थित होते.