मद्यधुंद अवस्थेत स्वतःच्याच डोक्यात दारूची बाटली मारून घेतल्याने एकाचा मृत्यू
By नामदेव भोर | Updated: June 21, 2023 15:36 IST2023-06-21T15:35:23+5:302023-06-21T15:36:03+5:30
याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

मद्यधुंद अवस्थेत स्वतःच्याच डोक्यात दारूची बाटली मारून घेतल्याने एकाचा मृत्यू
नामदेव भोर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : शहरातील मध्यवर्ती भागातील ठक्कर बाजार येथील बस स्थानकातील जनता हॉटेलच्या मागील भागात एका मद्यपीने मद्यधुंद अवस्थेत स्वत:च्याच डोक्यात दारूची बाटली मारून घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान मयत विकी अशोक पवार यांना जखमी अवस्थेत शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. होते मात्र याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी अशोक पवार (३१, रा. तिडके कॉलनी , राहूलनगर) याने सोमवारी (दि. १९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत स्वताच्याच डोक्यात दारूची बाटली मारून घेतल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्याला जखमी अवस्थेत शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र याठिकाणी त्याच्यावर औषधोपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. डॉ. कल्पेश शिलोडे यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.