शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी एक दिवसाची मुदतवाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 14:13 IST

महापालिका क्षेत्रातील सुमारे 57 महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रथम फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात संपर्क साधून प्रवेश घेण्यासाठी मंगळवारपर्यंत (दि.१०) मूदतवाढ  देण्यात आला आहे. प्रवेशप्रक्रियेच्या आॅनलाईन अर्जाचा भाग एक व भाग दोन भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळालेल्या ११ हजार ५४२ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ३ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी संधी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले असून प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी सोमवारी (दि.९) शेवटची मूदत होती.

ठळक मुद्देअकरावी प्रवेश प्रक्रियेची प्रथम फेरी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ प्रथम पसंतीच्या जागेवर प्रवेश घेणे अनिवार्य

नाशिक : महापालिका क्षेत्रातील सुमारे 57 महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रथम फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात संपर्क साधून प्रवेश घेण्यासाठी मंगळवारपर्यंत (दि.१०) मूदतवाढ  देण्यात आली आहे. प्रवेशप्रक्रियेच्या आॅनलाईन अर्जाचा भाग एक व भाग दोन भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळालेल्या ११ हजार ५४२ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ३ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी संधी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले असून प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी सोमवारी (दि.९) शेवटची मूदत होती. परंतु, प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूणही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत पुन्हा प्रवेशाची संधी मिळणार नसल्याने  असे विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत राहू  नये यासाठी  शिक्षण विभागाने पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी एक दिवसाची मूदत वाढ दिली आहे. त्यामुळे आता पहिल्या फेरीत प्रथम पसंतीच्या महाविद्यालयाच प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १० जूलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार असून आतापर्यंत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी संधी मिळालेल्या जागेवर आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे.दरम्यान, आतापर्यंत मराठी माध्यमातील कला शाखेसाठी वाटप झालेल्या २ हजार ४४ जागांपैकी ५७१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, ५ विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यात आले व एका विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केला आहे. तर वाणिज्यच्या २ हजार १६० पैकी ५६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, ४ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला व एका विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केला. इंग्रजी माध्यमातील कला शाखेसाठी १२ पैकी एकही जागेवर प्रवेश झालेला नाही. वाणिज्य शाखेच्या १९५५ पैकी ६८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर ६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. विज्ञान शाखेच्या ५१०० पैकी १४७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, ६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तर एमसीव्हीसीच्या मराठी माध्यमात १९३ पैकी ८० जागांवर प्रवेश झाले असून, इंग्रजी माध्यमाच्या १९ पैकी ५ जागांवर प्रवेश झाले असून, उर्दू माध्यमातील कला शाखेत ३१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यापैकी १३ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अशाप्रकारे पहिल्या फेरीत वेगवेगळ्या माध्यमाच्या अभ्यासक्रमासाठी संधी मिळालेल्या ११ हजार ५४२ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून २१ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तर दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले असून, ८ हजार ११३ विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेशासाठी संधी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये संपर्क साधलेला नाही. 

१३ जुलैला दुसरी गुणवत्ता यादीपहिल्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० जुलैला रिक्त जागांचा तपशील व पहिल्या फेरीचा कटआॅफ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच १० व ११ जुलैला ११ ते ५ या वेळेत अद्याप प्रवेशप्रक्रियेत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग व दोन भरण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर १३ जुलैला दुसरी नियमित गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिकEducationशिक्षण