ग्रामस्थांच्या हल्ल्यात दरोडेखोराचा मृत्यू; एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 10:48 IST2019-05-05T10:42:01+5:302019-05-05T10:48:55+5:30

चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

one dacoit died in villagers attack in nashik | ग्रामस्थांच्या हल्ल्यात दरोडेखोराचा मृत्यू; एक जखमी

ग्रामस्थांच्या हल्ल्यात दरोडेखोराचा मृत्यू; एक जखमी

चांदवड (नाशिक)- चांदवडजवळ खैसवस्ती भागात डॉ. प्रकाश त्र्यंबक कबाडे यांच्या शेतात शनिवारी रात्री उशिरा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चार ते पाच दरोडेखोरांनी नामदेव मोरे यांच्या कुटुंबावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. या हल्याच्या आवाजाने शेजारच्या वस्तीवरील लोक मदतीसाठी धावले. यावेळी झालेल्या तुफान हाणामारीत एका दरोडेखोराचा मृत्यू झाला. 

स्थानिकांनी मारहाण सुरू करताच इतर चार दरोडेखोर पळून जाऊ लागले. त्यावेळी त्यातील एकाला स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने पकडले असून तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर त्याला अधिक उपचारासाठी नाशिकला पाठवण्यात आले. या हाणामारीत चार ते पाच जण जखमी झाले. या प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनला उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नवनाथ कारभारी मोरे यांनी तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक संजय पाटील हे तपास करत आहेत.

Web Title: one dacoit died in villagers attack in nashik