शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात एक कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:24 IST

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. देवस्थान ट्रस्टच्या उप्पन्नात गेल्या दोन महिन्यात सुमारे एक कोटी रुपयांची घट झाल्याची माहिती ट्रस्टच्या सूत्रांनी दिली. उत्पन्नात घट झालेली असली तरी ट्रस्टने कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबिलेला नाही आणि वेतनातही कपात केलेली नाही.

वसंत तिवडे ।त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. देवस्थान ट्रस्टच्या उप्पन्नात गेल्या दोन महिन्यात सुमारे एक कोटी रुपयांची घट झाल्याची माहिती ट्रस्टच्या सूत्रांनी दिली. उत्पन्नात घट झालेली असली तरी ट्रस्टने कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबिलेला नाही आणि वेतनातही कपात केलेली नाही.श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे नारायण नागबली, त्रिपिंडीपासून विविध धार्मिक विधीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. याठिकाणी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक विधीसाठी येत असतात. त्र्यंबकेश्वर मंदिरावरच गावचे अर्थकारण अवलंबून आहे. या मंदिरामुळे नगर परिषदेलाही मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले आहेत. शिवाय, अनेकांना रोजगारही मिळालेला आहे. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने शहराचे अर्थकारणच बिघडले आहे. या देवस्थानवर शहरातील तमाम प्रसाद विक्री केंद्रे, हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग, किराणा माल, भाजी विक्री आदी व्यवसाय अवलंबून आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे हे सारे व्यवसाय ठप्प झाले आहेत. भाविक देवस्थानकडे फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे देवस्थानच्या उत्पन्नातही घट झाली आहे.त्र्यंबकेश्वर देवस्थानला लॉकडाऊनमुळे उत्पन्नात दरमहा ५० लाख रुपयांची घट झालेली आहे. उत्पन्नात घट झालेली असली तरी ट्रस्टने कर्मचारी कपात अथवा वेतन कपातीचा मार्ग अद्याप अवलंबिलेला नाही.देवस्थानच्या पदरी अधिकारी-कर्मचारी मिळून साधारणपणे १३० जण सेवेत आहेत. या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरमहासुमारे १७ लाख रुपये खर्चीपडतात. भाविकच नसल्याने नगर परिषदेच्या वाहनतळ शुल्कच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नही पूर्णपणे थांबले आहे.-----------------मुख्यमंत्रीनिधीसाठी मदतलॉक-डाऊनमुळे देवस्थानच्या उत्पन्नात घट झाली असली तरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख ५१ हजारांचा धनादेश तहसीलदार दीपक गिरासे यांच्याकडे सुपुर्द केला आहे तर आज कोरोना या विषाणूशी लढणाºया वैद्यकीय सेवेतील अधिकाऱ्यांना पीपीई किट्स, मास्क व फेस शिल्ड आदी साधने दिलेली आहेत. दरम्यान, देवस्थान उत्पन्नावर परिणाम होत असला तरी देवाच्या तिन्ही त्रिकाल दैनंदिन पूजा, सोमवारचा पालखी सोहळा यात कुठेही खंड पडलेला नाही.

टॅग्स :Nashikनाशिक