अंजनेरी गडावरून उडी घेत एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 00:44 IST2021-07-13T23:57:11+5:302021-07-14T00:44:45+5:30
त्र्यंबकेश्वर : अंजनेरी गडावरून गाजरवाडी येथील काळू परशराम शिद (२५) याने सोमवारी सकाळी ११.४५ दरम्यान उडी घेऊन आत्महत्या केली.

अंजनेरी गडावरून उडी घेत एकाची आत्महत्या
ठळक मुद्देअंजनेरीचे पोलीसपाटील संजय पोपट चव्हाण यांनी भ्रमणध्वनीवरून पोलीस ठाण्यात माहिती दिली.
त्र्यंबकेश्वर : अंजनेरी गडावरून गाजरवाडी येथील काळू परशराम शिद (२५) याने सोमवारी सकाळी ११.४५ दरम्यान उडी घेऊन आत्महत्या केली.
याबाबत अंजनेरीचे पोलीसपाटील संजय पोपट चव्हाण यांनी भ्रमणध्वनीवरून पोलीस ठाण्यात माहिती दिली. यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.