वीरगाव येथे एकाची शेततळ्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 01:03 IST2021-09-10T01:02:18+5:302021-09-10T01:03:32+5:30
सटाणा तालुक्यातील वीरगाव येथील ५६ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेततळ्यात उडी मारून जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.

वीरगाव येथे एकाची शेततळ्यात आत्महत्या
सटाणा : तालुक्यातील वीरगाव येथील ५६ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेततळ्यात उडी मारून जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.
धना अर्जुन गांगुर्डे यांनी बुधवारी (दि. ८) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या शेतातील शेततळ्यात उडी घेतली. गांगुर्डे यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. दोराच्या साह्याने त्यांना बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सटाणा पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.