लोणारवाडी जवळ दुचाकी - कार अपघातात एक ठार ; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 13:34 IST2018-10-30T13:34:01+5:302018-10-30T13:34:24+5:30
सिन्नर : सिन्नर - घोटी माहमार्गावर लोणारवाडी शिवारात सोमवार (दि. २९) रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हुंडाई कार व ...

लोणारवाडी जवळ दुचाकी - कार अपघातात एक ठार ; एक जखमी
सिन्नर : सिन्नर - घोटी माहमार्गावर लोणारवाडी शिवारात सोमवार (दि. २९) रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हुंडाई कार व मोटार सायकल यांच्यात अपघात होऊन दुचाकीवरील एकजण ठार तर एक जण जखमी झाल्याच घटना घडली. गोरख माणिक लोणारे (२० रा. लोणारवाडी, ता. सिन्नर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर गणेश प्रकाश जाधव (२१ रा. लोणारवाडी) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर नाशिक येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. घोटीहून सिन्नरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या हुडाई कारने (क्र. एम. एच. ०४ जी. डी. ६६४१) लोणारवाडी शिवारातील साईराम हॉटेलजवळ समोरून येणा-या दुचाकीला (क्र. एम.एच. ४१ ए.डी. ३४१७) जबर धडक दिली. त्यात गोरख लोणारे व गणेश जाधव हे जबर जखमी झाले. उपचारासाठी नेत असतानाच गोरख लोणारे याचे निधन झाले. जाधव याच्यावर नाशिकच्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. सिन्नर पोलीस ठाण्यात कार चालका विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक शंकर मोकळ पुढील तपास करीत आहेत. दरम्याान, मृत गोरख लोणारे याच्यावर लोणारवाडीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.