दाखलच्या तुलनेत दीडपट अधिक रुग्ण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:48 IST2020-07-27T00:48:33+5:302020-07-27T00:48:55+5:30
जिल्ह्यात रविवारी एकूण २७२ नवीन रुग्ण बाधित आढळून आले असून, बळींच्या संख्येत ३ जणांची भर पडल्याने एकूण बळींची संख्या ४५७ वर पोहोचली आहे. यातील महत्त्वाची दिलासादायक बाब म्हणजे रविवारी दाखल झालेल्या बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची ४३४ संख्या ही दीडपटीहून अधिक ठरली आहे.

दाखलच्या तुलनेत दीडपट अधिक रुग्ण बरे
नाशिक : जिल्ह्यात रविवारी एकूण २७२ नवीन रुग्ण बाधित आढळून आले असून, बळींच्या संख्येत ३ जणांची भर पडल्याने एकूण बळींची संख्या ४५७ वर पोहोचली आहे. यातील महत्त्वाची दिलासादायक बाब म्हणजे रविवारी दाखल झालेल्या बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची ४३४ संख्या ही दीडपटीहून अधिक ठरली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्याचे प्रयत्न प्रशासनासह आरोग्य विभागाकडून सुरू आहेत. तसेच अधिकाधिक रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच रविवारी बरे होऊन घरी सोडलेल्यांची संख्या प्रथमच ४३४ झाली. दरम्यान, रविवारी गेलेल्या बळींपैकी दोन बळी नाशिक शहरातील सिडकोतील, तर एक बळी हा त्र्यंबकेश्वरचा आहे.
जिल्ह्यात रविवारी दाखल संशयितांची संख्यादेखील हजाराच्या खाली घसरून ८२५ वर आली. तसेच प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ८११ वर पोहोचली आहे. रविवारी बाधित झालेल्या नवीन २७२ रुग्णांमुळे आतापर्यंतची एकूण बाधितसंख्या १२,१६२ झाली असून, त्यातील ९०३५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांच्या घरी परतले आहेत. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सध्या उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या २,६७० झाली आहे.