चाळीतून लांबविला दीड क्विंटल कां

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:17 IST2020-09-12T21:36:58+5:302020-09-13T00:17:45+5:30

लोहोणेर : येथील शेतकरी प्रभाकर धामणे यांच्या शेतातील कांद्याच्या चाळीतील सुमारे दीड क्विंटल कांदा चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

One and a half quintals | चाळीतून लांबविला दीड क्विंटल कां

लोहोणेर येथील शेतकरी प्रभाकर धामणे यांच्या याच चाळीतून चोरट्यांनी कांदा लंपास केला आहे.

ठळक मुद्दे खोडसाळपणा जाणीवपूर्वक केला असावा अशी चर्चा आहे.

लोहोणेर : येथील शेतकरी प्रभाकर धामणे यांच्या शेतातील कांद्याच्या चाळीतील सुमारे दीड क्विंटल कांदा चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेतकरी प्रभाकर रामचंद्र धामणे यांच्या मालकीची खाटकी नाल्याच्या लगत असलेल्या शेतामध्ये सुमारे एकशे वीस फूट लांब पत्र्याची पक्के बांधकाम असलेली चाळ आहे. सद्यस्थितीत चाळ कांद्याने पूर्णपणे भरलेली असून चारही बाजूंनी पूर्णता जाळी व लोखंडी गेट लावून बंद आहे. अशा अवस्थेतही लोखंडी गेटला असलेली तार तोडून चोरट्यांनी चाळीतून सुमारे दीड क्विंटल कांदा लंपास केला आहे. सद्यस्थितीत कांद्याला अडीच ते तीन हजारांचा भाव मिळत असून कोणीतरी हा खोडसाळपणा जाणीवपूर्वक केला असावा अशी चर्चा आहे.

 

Web Title: One and a half quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.