शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

दीड लाख विद्यार्थ्यांना ‘मुक्त’ची पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:15 AM

यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठातून यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी पदवी घेतली असून, त्यांचा पदवीप्रदान सोहळा सोमवार दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. यावर्षी १ लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवीप्रदान केली जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठातून यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी पदवी घेतली असून, त्यांचा पदवीप्रदान सोहळा सोमवार दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. यावर्षी १ लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवीप्रदान केली जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली. या दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मुरलीधर चांदेकर हे उपस्थित राहणार आहे. यावर्षी पदवी, पदविका घेणाऱ्यांमध्ये राज्यातील एक लाख विद्यार्थ्यांचा समावेश असून, या समारंभात एक लाख १७ हजार ३६९ विद्यार्थ्यांना पदवी, १५ हजार ६३२ पदविका, १८ हजार ३१३ पदव्युत्तर पदवी, ८४ हजार पदव्युत्तर पदवी, ११ एम फील, तर ३१ पीएचडी विद्यार्थी पदवीग्रहण करणार आहेत. यंदा पदवी, पदविका घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये पुरुषांची संख्या ९४ हजार २८१, तर महिलांची संख्या ६० हजार १५९ इतकी आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पुरुष विद्यार्थ्यांचे प्रमाण जरी वेगवेगळे असलेतरी महिलांचे ग्रामीण भागातील प्रमाण जवळजवळ सारखेच आहे. मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांत बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याचे चित्र आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. यावर्षी पदवी घेणाºया पुरुषांचे प्रमाण ५५, तर महिलांचे प्रमाण ४५ टक्के इतकेच आहे. स्त्री-पुरुष प्रमाणात सर्वाधिक महिलांची ९ हजार ५७६ संख्या ही नाशिक विभागात आहे. त्याखालोखाल ९ हजार ३२८ नांदेड आणि ८ हजार ३९० अमरावती विभागातील महिलांची संख्या आहे. शहरी भागातील विद्यार्थी ४९ हजार असून, उच्च शिक्षण समाजाच्या वंचित घटकांपर्यंत पोहचविण्याचे ध्येय असलेल्या मुक्त विद्यापीठाने ग्रामीण भागातही मोठी विद्यार्थी संख्या मिळविली आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदवी घेणाºया एकूण विद्यार्थ्यांपैकी १ लाख २ हजार ९८ विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे, तर आदिवासी भागातील १ हजार ५१२ विद्यार्थी आहेत. डिजिटायझेशनवर लक्ष केंद्रित केल्याने सध्या सर्व शिक्षणक्र मांचे निकाल वेळेत लावणे शक्य झाले असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, विद्यार्थी सेवा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश अतकरे, जनसंपर्क विभागाचे प्रभारी प्रमुख संतोष साबळे आणि उपकुलसचिव जयवंत खडताळे उपस्थित होते.यावर्षी विद्यार्थीसंख्येत वाढगेल्या वर्षीच्या संख्येपेक्षा यावर्षी पदवीग्रहण करणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ६० वर्षेपेक्षा अधिक वय असलेल्या तब्बल एक हजार ३१४ व्यक्ती आपले पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण करीत असून, त्यात सर्वाधिक ५०९ व्यक्ती मुंबईतील आणि २१४ विभागांतील आहेत. बी.एड.चे एक हजार ५०३ विद्यार्थी पदवी ग्रहण करीत असल्याचेही कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा अधिक देता याव्यात तसेच पारदर्शकता वाढावी म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर जास्त भर दिला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीuniversityविद्यापीठ