दीड लाख डोस कोविशिल्डचे डोस मागवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:32 IST2021-03-18T23:25:32+5:302021-03-19T01:32:42+5:30
नाशिक - कोरोनाविरोधातील लढ्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. एकीकडे सुपर स्प्रेडर्स शोधताना दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. सध्या डोस कमी पडले असल्या तरी दीड लाख कोविशिल्डचे डोस मागवण्यात आले आहेत; तर लसीकरणात अडचणी येऊ नयेत यासाठी आणखी २४ रुग्णालयांना परवानगी देण्यात आल्याची माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी गुरुवारी दिली.

नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या संदर्भात आयुक्त जाधव यांनी ही माहिती दिली.
प्रश्न - शहरात कोरोनाची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसांपासून लसीकरणात अडचणी येत आहेत.
आयुक्त - होय. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन प्रकारचे डोस नाशिकमध्ये प्राप्त झाले आहेत. मात्र, त्यातील कोविशिल्डचे डोस संपले आहेत. अगोदरच त्याची तयारी म्हणून दीड लाख डोस मागविण्यात आले आहेत. ते आज, शुक्रवारी प्राप्त होतील. त्यामुळे उद्या, शनिवार रविवारी (दि. २१) देखील लसीकरण करण्यात येईल. याशिवाय शहरात आणखी २४ खासगी रुग्णालयांत लसीकरणाची सोयय करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या केंद्रांवरील ताण कमी होईल.
प्रश्न- कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पुन्हा रुग्णालयांची गरज वाढू लागली आहे.
आयुक्त- कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. महापालिकेची आणि खासगी रुग्णालये मिळून एकूण ३ हजार ६३६ बेडस्ची सोय करण्यात आली आहे. त्यांपैकी सध्या एक हजार १०७ रुग्णच रुग्णालयात उपचार घेत असल्याने ८६ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत; परंतु सध्या रुग्णवाढीचा वेग बघितला तर कदाचित कोरोना केअर सेंटर्स सुरू करावी लागतील. त्या दृष्टीने नियोजन सुरू असून कंत्राटी पद्धतीने पाचशे आरोग्य-वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत आहे.
प्रश्न- कोरोना चाचण्या वाढल्या तरी अहवाल खूप प्रलंबित आहेत. महापालिकेची लॅब केव्हा सुरू होणार?
आयुक्त- महापालिकेची कोविड लॅब सुरू होण्याच्या मार्गावर आहे. येत्या रविवारी त्यात दोन नमुने तपासून तेच आयसीएमआरमध्ये पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर साधारणत: २५ मार्चपासून लॅब सुरू होईल. त्यामुळे अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी होईल.