राजराजेश्वरी चौकात अपघातात वृद्ध ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:55 IST2020-08-12T23:38:42+5:302020-08-12T23:55:20+5:30
नाशिकरोड : मराठानगर, राजराजेश्वरी चौकात पेन्शन घेण्यास जाणाऱ्या वृद्धाला बुलेटने ठोस दिल्याने ते गंभीर जखमी होऊन मयत झाले.

राजराजेश्वरी चौकात अपघातात वृद्ध ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : मराठानगर, राजराजेश्वरी चौकात पेन्शन घेण्यास जाणाऱ्या वृद्धाला बुलेटने ठोस दिल्याने ते गंभीर जखमी होऊन मयत झाले.
जेलरोड परिसरातील मराठानगर यशोधन ईलाइट येथे राहणारे भरत नरोत्तम निकुंभ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मित्रांसह दुकानाजवळ बोलत होते. यावेळी त्यांचे वडील नरोत्तम जग्गनाथ निकुंभ हे पेन्शन घ्यायला बॅँकेत जाण्यासाठी इमारतीतून खाली उतरून रस्त्याच्या कडेला उभे होते. यावेळी ढिकलेनगरकडून भरधाव बुलेटने (क्र. एमएच १५जीटी ३११३) त्यांना जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.